ई-लर्निंग म्हणजे काय?
डिजिटल माध्यमातून शिकणे याला ई-लर्निंग म्हणतात. कॉम्प्युटर, मोबाईल फोन आणि लॅपटॉप हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शिक्षण सुरू करण्यासाठी मुख्य घटक आहेत. आजच्या डिजिटल जगात प्रत्येकजन डिजिटल प्लॅटफॉर्मशी संबंधित कुठे तरी गुंतलेला आहे. नविन पद्धतीने चालण्यासाठी आणि नविन ट्रेंडसह जाण्यासाठी, लोक ई-शिक्षणाकडे वळले आहेत. आपल्याला या काळात ई-शिक्षणाची आवश्यकता किती आहे हे तर महिती आहेतच. ई-शिक्षण आपल्याला आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदद करते आणि कुठलेही वेळेचे नियम नसणारे वातावरण देते.

ई-स्कॉलर का?
या काही वर्षात अशी अनेक ई-लर्निंग पोर्टल आले आहेत जे ऑनलाईन शिक्षण देतात. आणि कोविड -१९ नंतर तर ऑनलाईन शिक्षणाची गरज बरीच वाढली आहे. जे विद्यार्थी आपला अभ्यास गमावत आहेत आणि महागड्या अँप्लिकेशन वरून ऑनलाईन लेक्चर घेण्यास आर्थिक पद्धतीने सक्षम नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी ई-स्कॉलर एकदम उत्तम सेवा घेऊन आला आहे. कारण ई-स्कॉलर मध्ये, आम्ही केवळ उत्कृष्ट ज्ञानच देत नाही तर ज्यांची कुटुंबे आर्थिकदृष्ट्या स्थिर नाहीत अशा विद्यार्थ्यांना मदत सुद्धा करतो .ग्रामीण भागात मुलांना शिक्षा मिळावी त्यासाठी आम्ही कमी फीस मध्ये उत्कृष्ट शिक्षण मुलांना देत आहोत. प्रत्येक ग्रामीण आणि शहरी भाग डिजिटली सक्रिय करण्यात ई-स्कॉलर खूप मोठे योगदान सुद्धा देत आहे.





ई-स्कॉलरचे ध्येय
ई-स्कॉलरचे मुख्य उद्धिष्ट म्हणजे आपल्या घरात शाळा आणणे होय. लॉकडाउन मुळे ज्या मुलांचे शिक्षण वाया चालले आहे त्या मुलांसाठी आम्ही अत्यंत सोईस्कर पोर्टल आणले आहे. जे एका मनोरंजक मार्गाने लेसन्स शिकविण्यात सक्षम असणार आणि सर्व विद्यार्थ्यांसमोर असलेल्या शंका सोडविण्यास सुद्धा सक्षम असणार. आमची टीम आपल्याला सर्वोत्कृष्ट ज्ञान, तंत्र आणि स्पष्टीकरण देण्यासाठी कधीही तत्पर आहे. आमचे मुख्य उद्दिष्ट आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणीकडे दुर्लक्ष करून शिक्षण प्रदान करता यावे. ई-स्कॉलर कमीतकमी फीसमध्ये जास्तीत जास्त लाभ देतो . ज्यामुळे ज्या लोकांची आर्थिक परिस्तिथी चांगली नाही ते देखील इथे शिक्षण घेऊ शकेल.
आम्ही प्रत्येक पाठानुसार नियमितपणे प्रत्येक कन्सेप्टचे उत्तम ज्ञान प्रदान करतो. स्थान, क्षेत्र आणि पार्श्वभूमी काहीही असो, आम्ही ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांचे ज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. ई-स्कॉलर हे एक असे पोर्टल आहे जे सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना नियमित धडे शिकविण्यासाठी कायम तयार आहे.
ई-स्कॉलर ची दृष्टि

ई-शिक्षणाचे फायदे:
ई-लर्निंगची लोकप्रियता आणि वाढती मागणी याबद्दल आपण सर्वजण जागरूक आहोतच. याचा वापर करणाऱ्या मुलांना खूप फायदा होतो. ई-लर्निंग आपले भविष्य किती उज्ज्वल बनवू शकतो हे तर आपल्याला ठाऊक आहेच. ऑनलाईन पद्धतीने शिकण्याचे आणि ई-स्कॉलरमध्ये सामील होण्याचे काही फायदे खाली दिले आहेत:

कोणत्याही वेळी शिका.
स्कुल किंवा ट्युशन क्लास मध्ये जाण्याने तुम्हाला कंटाळा तर येतोच, सोबतच प्रवासात तुमचा वेळ सुद्धा वाया जातो. तसेच, ट्युशन क्लास मध्ये उपस्थित राहण्यासाठी तुम्हाला विशिष्ट वेळेचे पालन करावे लागते. म्हणून ई-स्कॉलर आपल्याला कोणत्याही वेळी शिकण्याचा फायदा देतो तसेच क्लास मध्ये जाण्यासाठी आपल्याला आपला वेळ वाया घालावा लागत नाही.

कोणत्याही जागेचे बंधन न पाळता ऑनलाईन शिक्षणाचा आनंद घ्या.
शाळांवर ई-स्कॉलरचा एक फायदा म्हणजे आपण कोठेही शिकू शकता. सध्याच्या कोविड -१९ परिस्थितीत शाळा तर आधीच बंद आहेत ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणावर विपरित परिणाम झाला आहे. अनेकदा अशी परिस्थिती असते की जेव्हा विद्यार्थी दुसऱ्या शहरात गेले असतील तर त्यांना क्लास घेता येत नाही. यामुळे मुलांचे त्या दिवसाचे वर्ग गहाळ होते. पण ई-स्कॉलर ऑनलाइन लेक्चर्स देते ज्यामुळे आपल्याला कोणत्याही ठिकाणी क्लासेस घेण्याचा फायदा मिळतो.
आपण समान धडा कितीदाही बघू शकता.
ई-स्कॉलर आपल्याला रिपीटेशन प्रक्रिया करू देतो, म्हणजेच आपल्याला पाहिजे तितक्या वेळा लेक्चर्स घेण्याची परवानगी देतो. बऱ्याच वेळा असे घडते की काही कन्सेप्ट एका वेळात समजल्या जात नाहीत, परंतु दोनदा किंवा तीनदा क्लास पुन्हा बघून समजण्यात मदत मिळते. ई-स्कॉलर हे एक लाभदायक पोर्टल आहे ज्याद्वारे आपण अनेक वेळा एकच विषय शिकू शकता व तुमच्या शंका दूर करू शकता.

खोल ज्ञान प्रदान करते
भरपूर पोर्टल्स अशे असतात जिथे फक्त वर-वरून शिकवतात आणि मुलांना सोडून देतात. पण इथे आम्ही फक्त मुख्य मुद्दे समजावत नाही. आम्ही प्रत्येक धडा आणि प्रत्येक कन्सेप्ट बद्दल सखोल ज्ञान प्रदान करतो. व्हिडीओ स्पष्टीकरण आणि वेळोवेळी लक्ष देणारी लेक्चर्स आपल्याला प्रत्येक कन्सेप्ट मागील उत्कृष्ट कल्पना आणि शास्त्र समजावण्यात मदत मिळवून देतो.

खर्च अनुकूल
ई-स्कॉलर हा एक असा प्लैटफॉर्म आहे जो व्यवसाय दृष्टी ने विचार न करता विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करतो. बाकी ई-लर्निंग पोर्टल मध्ये केवळ श्रीमंत लोकच शिक्षण घेऊ शकतात. पण ई-स्कॉलरचा मुख्य हेतू शिक्षणावरचा खर्च कमी करणे हा आहे. म्हणूनच आम्ही कमी खर्चात मुलांना शिक्षण प्रदान करीत आहोत.

आकर्षक ऑनलाइन क्लासेस
मुलांना समजणे सोपे व्हावे आणि त्यांना पूर्णपणे शिक्षण मिळावे म्हणून आम्ही उत्तम पद्धतीने शिकवतो. व्हिडीओ लेक्चर्स विद्यार्थ्यांमध्ये रूची वाढवते म्हणून आम्ही प्रत्येक व्हिडीओ सखोल ज्ञान घेऊन तयार करतो. ई-स्कॉलर व्हिडीओ लेक्चर्स अधिक आकर्षक बनवतो ज्यामुळे विद्यार्थ्यांना कन्सेप्ट पटकन समजण्यास मदत मिळेल
कोण ई-स्कॉलर मध्ये सामील होऊ शकेल:
- 1.जे विद्यार्थी शिकण्यास इच्छुक आहेत परंतु लॉकडाऊनमुळे ते करण्यास असमर्थ आहेत.
- २. आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष देत आहोत जे आपले शिक्षण गमावत आहेत.
- ३. आम्ही प्रत्येक अध्यायात ऑनलाईन व्याख्यान देतो जेणेकरून विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्णपणे व्हावा.
- ४. ज्या विद्यार्थ्यांनी शिकवणी वर्गातून डिस्कनेक्ट केले आहे आणि शिकण्यासाठी चांगल्या जागेचा शोध करीत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही येथे तयार आहोत.
- ५. जे विद्यार्थी अत्यंत कमी किंमतीत उच्च-स्तरीय शिक्षण घेण्याच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ई-स्कॉलर मध्ये सामील होणे अत्यंत फायदेशीर ठरेल.
- ६. ज्या विद्यार्थ्यांना पुस्तकांमधून शिकणे कठीण जाते त्यांच्यासाठी ई-स्कॉलर हा एक उत्तम पर्याय आहे कारण त्यामध्ये व्हिडीओ फॉरमॅटमध्ये धडे शिकविले जातात जे ज्ञान मिळविण्याचा एक सोपा मार्ग आहे.
